शेतकऱ्याला ना कर्जमाफी ना सरकारच्या योजनेचे फायदे !

शेतकऱ्याला ना कर्जमाफी ना सरकारच्या योजनेचे फायदे !

सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

यवतमाळ : सरकारची खोटी आश्वासने आणि फसव्या योजनांचे वास्तव यवतमाळच्या मडकोना गावात उघडकीस आल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोटया आश्वासनामुळे जीण मुश्किल झालेल्या शेतकऱ्याची घरी भेट दिली. त्यावेळी धक्कादायक वास्तव समोर आले.

यवतमाळ तालुक्यातील मडकोना गावातील जीवनराव बाबाराव माकडे या शेतकऱ्याने मागेल त्याला शेततळे या योजनेखाली सरकारकडे शेततळे,विहीर आणि दीड लाखाची कर्जमाफी मिळावी म्हणूनही सरकारकडे मागणी केली मात्र सरकारने ना शेततळे दिले ना विहीर दिली, ना कर्जमाफी केली फक्त आश्वासनापलीकडे या सरकारने काहीच दिले नाही हे गंभीर वास्तव जीवनराव माकडे शेतकऱ्याने खा. सुळे यांच्यासमोर मांडले.

कर्जमाफी न मिळालेल्या शेतकरी जीवनराव माकडे यांची पत्नी लता माकडे यांना ही व्यथा  सांगताना रडूच आवरत नव्हते. लता माकडे यांनी जे वास्तव सांगितले त्याने सुप्रिया सुळेही भावूक झाल्या. कर्जबाजारी असल्यामुळे मुलांचं शिक्षण होईना कस फेडाव कर्ज हेच कळंना अशा भावना त्या महिलेने सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडल्या. सुप्रिया सुळे यांनी त्या महिलेचे सांत्वन करताना मी आणि माझा पक्ष तुम्हाला न्याय मिळवून देवू.मी स्वत: यामध्ये लक्ष घालून कलेक्टरना सांगते असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी त्या शेतकरी कुटुंबाला दिले.

आज पदयात्रेचा दुसरा दिवस असून मडकोना गावातून याची सुरुवात झाली. याचवेळी जीवनराव माकडे या शेतकऱ्याची खा. सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. आणि त्यावेळी हे वास्तव समोर आलं आणि सरकार किती खोटं बोलत आहे हे खा. सुळे यांनी हल्लाबोल पदयात्रेतून समोर आणले आहे .

Previous articleवाल्यां’च्या आगमनामुळे भाजपचा विकास झाला, भाजप संपन्न झाला !
Next articleनिरूपम यांच्या घराबाहेर “आक्षेपार्ह” फलक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here