महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या
जयंत पाटील यांची मागणी
वर्धा : सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावीच शिवाय सोयाबीन,कपाशी,तुरीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळायला हवी अशी मागणी माजी मंत्री जयंत पाटील यांनी वर्धाच्या देवळी येथील इंदिरा गांधी चौकातील सभेत केली.
सभेच्या सुरुवातीला स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माजी मंत्री जयंत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर सभेत आमदार शशिकांत शिंदे,आमदार प्रकाश गजभिये,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची भाषणे झाली.
या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रकाश गजभिये, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार संदीप बजोरिया, सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत,महिला जिल्हाध्यक्षा शरयू वांदिले आदींसह वर्धा,यवतमाळ जिल्हयातील पदाधिकारी,कार्यकर्ते,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.