मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर शाॅर्टसर्किटमुळे आग
मुंबई : मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर रात्री उशीरा शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. घटनास्थळी चार बंब तात्काळ दाखल झाल्याने अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश मिळाले आहे.
काल रात्री ( सोमवारी) १० वाजून २० मिनिटाच्या सुमारास विस्तारीत मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर स्विच बोर्डमध्ये किरकोळ शाॅर्टसर्किट होवून ,आग लागल्याची घटना घडली असून,याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब दाखल झाले आणि काही मिनिटांमध्ये ही आग विझवण्यात यश आले. २१ जून २०१२ रोजी मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगी नंतर २१ जून २०१४ रोजी मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर शाॅर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली होती. काल ४ डिसेंबर २०१७ रोजी पहिल्या मजल्यावर आग लागल्याने मंत्रालयातील विद्युत कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.