नाही तर भाजपाच्या आमदारकीचा राजीनामा देणार !

नाही तर भाजपाच्या आमदारकीचा राजीनामा देणार !

मुख्यमंत्री आणि गडकरींनी आश्वासन पाळले नाही

आ. विकास कुंभार यांचा घरचा आहेर

नागपूर : आदिवासी हलबा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी भाजपाच्या आमदारकीचा राजीनामा देईल असा इशारा भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी भाजपा आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हलबा समाजाला दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करीत, आता हा समाज भाजपाला आपली ताकद दाखवून देईल असा इशाराही त्यांनी दिला. स्वपक्षावरच टीकास्त्र सोडताना त्यांच्यासोबत उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि भाजपाचे पाच नगरसेवकही उपस्थित होते.

भाजपचे आ. विकास कुंभारे म्हणाले की, आदिवासी हलबा समाजावर अनेक वर्षे सुरू असलेला अन्याय दूर होईल म्हणून गेल्या निवडणूकीत या समाजाने मोठ्या प्रमाणात भाजपाला भरभरून मते दिली व भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणले. माझाही त्यात समावेश आहे. मात्र राज्यात आणि केंद्रात असलेल्या भाजपाने निवडणूकीवेळी या समाजाला दिलेले एकही आश्वासन पाळले नाही. काँग्रेसच्या काळात समाजातर्फे झालेल्या बहुतेक आंदोलनाचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी केले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर हेच नेते हलबा समाजाच्या मागण्या विसरले आहेत असा आरोप आ.कुंभारे यांनी केला.

Previous articleमंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर शाॅर्टसर्किटमुळे आग
Next articleआबांच्या कन्येचा साखरपूडा अंजनी गावात होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here