आबांच्या कन्येचा साखरपूडा अंजनी गावात होणार

आबांच्या कन्येचा साखरपूडा अंजनी गावात होणार

१ मे रोजी पुण्यात विवाह

पुणे : दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील अर्थात आबांची कन्या स्मिता पाटील हिचा दौंडचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांचा पुतण्या आनंद थोरात याच्याची येत्या शनिवारी आबांच्या अंजनी गावात साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आहे तर; शुभविवाह येत्या महाराष्‍ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी पुण्यातील मगरपट्टा सिटी येथे संपन्‍न होणार आहे. हे लग्न जुळवण्यासाठी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे.

आबांच्या निधनानंतर पाटील त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे . त्यामुळे हे लग्न जुळवून आणण्यासाठी स्वतः पवार यांनी पुढाकार घेतला आहे . आर. आर. पाटील आणि रमेश थोरात हे दोघेही शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत. शरद पवार हे लग्‍न समारंभासाठी दिवसभर थांबणार आहेत.आबांच्या निधनानंतर तासगाव मतदार संघाचे नेतृत्‍व पत्‍नी सुमनताई पाटील यांच्याकडे आहे. त्या आमदारही आहेत. तर आबांची मुलगी स्मितावर राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांचेही आर. आर. पाटलांच्या कुटुंबियांकडे विशेष लक्ष असते.

Previous articleनाही तर भाजपाच्या आमदारकीचा राजीनामा देणार !
Next articleसी लिंक वाहतुकीस खुला; अफवांवर विश्वास ठेऊ नका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here