जिनिंगमध्ये जावून अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
वर्धा : नाकर्त्या सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरु केलेल्या हल्लाबोल पदयात्रेला पाचव्या दिवशीही शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज वर्धाच्या देवळी गावातून या पदयात्रेला सुरुवात झाली.जिनिंगमध्ये जावून अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी कापसाला भाव मिळत नसल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली.
हल्लाबोल पदयात्रेच्या सुरुवातीलाच राजीव गांधी विदयालयाच्या विदयार्थ्यांनी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे स्वागत केले.अजित पवार यांनी यावेळी विदयार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर महाविद्यालयीन विदयार्थ्यांनीही पदयात्रेतील नेत्यांचे स्वागत केले. याचवेळी जिनिंगमध्ये जावून अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी कापसाला भाव मिळत नसल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली. याचवेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देवळीमधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पदयात्रेमध्ये ठिकठिकाणी लोकं येवून भेट देत होते आणि आम्हाला न्याय मिळवून द्या असे सांगत होते.
या पदयात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,माजी मंत्री जयंत पाटील,माजी मंत्री राजेश टोपे,आमदार शशिकांत शिंदे, आमदार विदया चव्हाण,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,माजी आमदार संदीप बजोरिया,माजी आमदार सुरेश देशमुख,वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले,यवतमाळ महिला जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे-राऊत, वर्धा जिल्हाध्यक्षा शरयू वांदिले,प्रवक्ते महेश तपासे, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला कार्यकर्त्या,शेतकरी आणि पुणे येथील शरद कला क्रीडा मंडळाच्या युवतीही सहभागी झाल्या आहेत.