आता मुंबईत “नो हॉर्न डे” उपक्रम

 

आता मुंबईत “नो हॉर्न डे” उपक्रम

मुंबई : कर्णकर्कश आवाजाच्या हॉर्नमुळे ध्वनीप्रदूषण होतेच मात्र त्यामुळे रुग्णविद्यार्थी आणि नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होतो. या आवाजाचे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. अचानक वाजलेल्या हॉर्नमुळे गंभीर अपघात हि घडले आहेत. या सर्व अनपेक्षित घटना टाळण्यासाठी ‘नो हॉर्न डे’ हा उपक्रम गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांनी सुरु केला आहे.

वाहनचालकांकडून वाजविले जाणा-या हॉर्न्समुळे सगळ्यांनाच त्रास होतो. गरज नसतानाही मोठमोठ्याने हॉर्न वाजविल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत असते. हे प्रदूषण रोखण्यासाठी आता ‘नो हॉर्न डे’ हा उपक्रम राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सुरू केला असून मुंबईतील परिवहन विभागाने या उपक्रमाची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणीला सुरूवात केली आहे. रस्त्यात जागोजागी उभे राहून स्वतः अधिकारी वाहनचालकांना हॉर्न बंदीचे पत्रके देत आहेत. वाहनचालकही या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करताना अनेक ठिकाणी दिसत आहे. यावेळी गृह राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी स्वतः रस्त्यावर वाहनचालकांना हॉर्न बंदीचे पत्रके दिले व ध्वनीप्रदूषणमुक्त राज्य म्हणून महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे असे अवाहन यावेळी डॉ.पाटील यांनी केले.

 

Previous articleओखी चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून भरपाई द्या
Next articleसुप्रिया सुळेंनी केली विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याची विचारपूस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here