विधानपरिषद निवडणूकीत प्रथमच “नोटा”चा वापर

विधानपरिषद निवडणूकीत प्रथमच “नोटा”चा वापर

मुंबई : आज पार पडलेल्या विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीत प्रथमच “नोटाचा” वापर करण्यात आला आहे.त्याच बरोबरच मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर छायाचित्र छापण्यात आले होते.

सार्वत्रिक निवडणूकीत वापरण्यात येणारा “नोटाचा” पर्याय प्रथमच विधानपरिषदेत अवलंबिण्यात आला मात्र आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत याचा एकाही मतदाराने वापर केला नाही. त्याच सोबत या निवडणूकीत प्रथमच मतपत्रिकेत उमेदवाराच्या नावासमोर उमेदवाराचे छायाचित्र छापण्यात आले होते. एवढी सारी दक्षता बाळगूनही दोन आमदारांची मते बाद झाली. एका मतपत्रिकेवर प्रसाद लाड यांच्या नावासमोर एक हा अंक लिहिण्याबरोबर दिलीप माने यांच्या नावासमोर फुली हे चिन्ह लिहिले होते. तर दुस-या बाद झालेल्या मतपत्रिकेवर अस्पष्ट मत नोदविण्यात आल्याने ही दोन मते बाद ठरविण्यात आली.

Previous articleप्रसाद लाड यांचा एकतर्फी विजय
Next articleसरपंचांना मिळणार ओळखपत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here