तब्बल ३२ वर्षानंतर शरद पवार करणार मोर्चाचे नेतृत्व करणार
नागपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज काढण्यात येणाऱ्या ‘हल्लाबोल’ ‘जनआक्रोश’ मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रिय मंत्री गुलाम नबी आझाद करणार आहेत. त्यामुळे तब्बल ३२ वर्षांनंतर शरद पवार हे सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. १९८५ साली शरद पवार यांनी जळगाव ते नागपूर अशी शेतकरी दिंडी काढत कॉग्रेस सरकारच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर आता भाजपा सरकारच्या विरोधात पवार रस्त्यावर उतरत आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ७७ वा वाढदिवस आहे मात्र ते वाढदिवसा दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारच्या विरोधात. रस्त्यावर उतरणार आहेत.आज नागपूर मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून “हल्लाबोल” आणि “जन आक्रोश” मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शरद पवार आणि माजी केंद्रिय मंत्री गुलाम नबी आझाद करणार आहेत. त्यामुळे तब्बव ३२ वर्षांनंतर शरद पवार हे पुन्हा एकदा सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. १९८५ साली शरद पवार यांनी जळगाव ते नागपूर अशी शेतकरी दिंडी काढत त्यावेळच्या कॉग्रेस सरकारच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर आता भाजपा सरकारच्या विरोधात पवार रस्त्यावर उतरत आहेत. या मोर्चामध्ये शेकाप, समाजवादी पक्ष, पीआरपी (कवाडे ) देखील सहभागी होणार आहे. शरद पवार आपला वाढदिवस दरवर्षी त्यांच्या राहत्या घरी साजरा करतात. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र या असवेदनशील सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही या मोर्चाद्वारे विधान भावनावर धडकणार आहोत. आजच्या मोर्चात सुमारे २ लाख कार्यकर्ते सहभागी होतील अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.