धमक्या देणे थांबावा ! अन्यथा बळीराजा सरकार उध्वस्त करेल

धमक्या देणे थांबावा ! अन्यथा बळीराजा सरकार उध्वस्त करेल

नागपूर : राज्याचे प्रमुख या नात्याने राज्य सरकार चालवणे हा तुमचा अधिकार आहे. परंतु तुम्ही नेहमी धमक्या देता त्या देणे थांबावा अन्यथा बळीराजा तुमचे सरकार उध्वस्त करेल असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

हजारो कोटींच्या सिंचन घोट्याळ्याचा आरोप असलेल्या अजित पवार यांच्या मदतीला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धावले आहेत. राज्याचे प्रमुख या नात्याने राज्य सरकार चालवणे हा तुमचा अधिकार आहे परंतु तुम्ही नेहमी धमक्या देता त्या देणे थांबावा अन्यथा बळीराजा तुमचे सरकार उध्वस्त करेल असा गर्भित इशारा शरद पवार यांनी आज दिला आहे. यांच्या घोटाळ्यांबाबत अजून बोललो नव्हतो आता सभागृहात सविस्तर बोलेन असा धमकी वजा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनो विरोधकांना दिला होता.

शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित करा तसे न केल्यास राज्यातील शेतकऱ्यांनी ज्या ज्या वित्तीय संस्थाकडून कर्ज घेतले आहे ते कोणत्याही प्रकारचे कर्ज शेतकऱ्यांनी भरू नये अशी असहकाराची घोषणा शरद पवार यांनी नागपूर येथे झालेल्या हल्लाबोल जनआक्रोशा दरम्यान केली. यावेळी माजी केन्द्रियमंत्री गुलाम नबी आझाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते, तसेच सपाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील, यांच्या विरोधी पक्षातील नेते देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे ३२ वर्षांनंतर शरद पवार रस्त्यावर आंदोलसाठी उतरले होते तेही वाढदिवसा दिवशी. गेल्या सहा महिन्यापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घोषणांचा पाऊस पडत आहे. परंतु प्रत्यक्षात कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. सरकारच्या या घोषणा बाजीला जनता कंटाळली आहे. या झोपलेल्या सरकारला हल्लाबोल करून जागे करण्यासाठी आणि संधी मिळेल तेव्हा सरकार उलथवून टाकायचा निर्धार करा असे आवाहन पवार यांनी केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली. सध्या विविध वाहिन्यांवर ‘मी लाभार्थी’च्या जाहिराती झळकत आहेत. मात्र या देशात दोनच लाभार्थी आहेत त्यातले एक आहेत देवेंद्र फडणवीस आणि एक नरेंद्र मोदी अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जन आक्रोश हल्लाबोल आंदोलना दरम्यान केली.

Previous articleमुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावच नाही
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here