मुंबई बँकेची आर्थिक स्थिती चांगली
अनियमिततेशी
संचालकांचा संबंध नाही
सहकारमंत्र्यांची माहिती
नागपूर : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आढळलेल्या अनियमितते प्रकरणी दोन अधिकार्यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणाशी या बॅकेच्या संचालकांचा कसलाही संबंध नसून, पदाधिकार्यांच्या नातेवाईकांनी गैरव्यवहार केलेला नाही असे स्पष्ट करतानाच बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत उत्तम असून सर्व कर्जाची वसुली सुरू आहे. या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली जाईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत प्रश्तोत्तराच्या तासात दिली.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शाखांमध्ये बोगस कर्जे वाटप केल्याची प्रकरणे सापडली होती. यासंदर्भात दक्षता विभागाने केलेल्या चौकशीत काय आढळले असा प्रश्न प्रश्तोत्तराच्या तासात भाजपचे संजय सावकारे उपस्थित केला होता याला उत्तर देताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी याप्रकरणात संचालकांच्या नातेवाईकांना कर्ज दिल्याचे प्रकरण आढळलेले नाही तर ; दोन अधिकार्यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे अधिकारी खातेनिहाय चौकशीत दोषी आढळले तरच त्यांच्यावर कारवाईबाबात निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.