राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव
धनंजय मुंडे
नागपूर : सरकारचे शिक्षणासंदर्भातील किती दुटप्पी आणि उदासिन धोरण आहे हे लक्षात आले. राज्यातील १३०० च्यावर शाळा बंद करण्याचा डाव शिक्षणमंत्र्यांनी चालू केला आहे. विनाअनुदानित शाळांचे अनुदान सुरु करण्याबाबतीत हे सरकार सकारात्मक नाही. मग प्राथमिक शिक्षण असो,माध्यमिक असो किंवा कनिष्ठ महाविद्यालय असो एकंदरीतच सर्व महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचे पूर्ण वाटोळे झालेले आहे. आणि याला राज्याचे शिक्षणमंत्री जबाबदार आहेत असा आरोप करतानाच यासंदर्भात उत्तर देताना कोणतेही ठोस उत्तर मंत्र्यांना देता आले नाही. आणि जे उत्तर दिले तेसुध्दा सत्तेच्या मस्तीमध्ये दिले आणि म्हणून विधानपरिषदेमध्ये शिक्षणासंदर्भात सरकारच्याविरोधात बहिष्कार आम्ही टाकला. शिक्षणाच्या प्रश्नावर दोनवेळा सभागृह बंद झाले अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. आज प्रश्नोत्तराच्या तासामध्ये शिक्षणविभागाच्या प्रश्नावर विधानपरिषदेमध्ये सरकारला धारेवर धरले.