महाराजांच्या जन्मतारखेचा घोळ थांबवा अन्यथा आगडोंब उसळेल
आमदार जितेंद्र आव्हाड यांचा इशारा
नागपूर : शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा घोळ जो बंद झालेला आहे. तो परत सुरु करु नये आणि ज्यांना इतिहासाबद्दल काहीच माहिती नाही त्यांनी असे भाष्य करुन महाराष्ट्राच्या मनाला डिवचेल असे वागू नये याच्यातून महाराष्ट्रात आगडोंब उसळल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
आज सभागृहामध्ये भाजप आमदार सुरेश हळवणकर यांनी पॉईंट ऑफ इंफॉर्ममेशनच्या माध्यमातून ८ एप्रिल ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणून जाहीर करावी अशी मागणी केली. यावर सभागृहामध्ये गदारोळ झाला आणि दोन्ही बाजुने सदस्यांनी गोंधळ घातला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसेपाटील यांनी यावर आक्षेप घेतला.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचा हा स्पॉन्सर प्रयोग असल्याचा आरोप केला. त्यांनी भाजपाच्या एका सदस्याने शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेवरुन एक नवीन माहिती जाहीर केली त्याचा इतिहासाशी कुठेही संदर्भ लागत नाही त्यामुळे आम्ही तो विषय पटलावरुन काढून टाकावा अशी मागणी केली.पण अध्यक्षांनी तो मान्य केला नाही अशी माहिती दिली.
शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेवरुन आणि जन्मदिवसावरुन अनेक इतिहास तज्ज्ञांनी नोंदी नोंदवल्या आहेत. आणि याच्यावरुन महाराष्ट्रामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. एकदा का शासनाने १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख निश्चित केली. त्या निर्णयाला चॅलेंज करण्याचा अधिकार या सभागृहाला नाही. पण मुद्दामहून शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेवरुन घोळ घालण्याचा जो काही एक विशिष्ट हेतूने केलेला हा प्रयोग आहे हा मला वाटतं भाजपा स्पॉन्सर आहे.
शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचे काम युगानेयुगे चालत आले आहे. ते आज सभागृहाच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्लॅन भाजपाने केला आहे. यापूर्वीही त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना ज्यांनी शिवाजी महाराज आणि जिजाऊंचा अपमान केला त्यांना महाराष्ट्र भूषण दिलेला आहे. आता हा प्रश्न उपस्थित करुन इतिहासाचे विद्रुपीकरण करण्याचे काम भाजपाच्या वारंवार मनात आहे. ते काम एका सदस्याने सभागृहात केले. आमचा याला विरोध आहे असा आरोपही आव्हाड यांनी केला