अर्ज नसताना कोल्हापूर जिल्हा बँकेने आ. प्रकाश अबीटकर यांचे खाते सरकारकडे पाठविले
नागपूर : शिवसेनेचे आमदार प्रकाश अबीटकर यांचे कर्जखाते कर्जमाफीतील २५ हजार रूपये प्रोत्साहन अनुदानाच्या यादीत आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. परंतु अर्ज नसताना कोल्हापूर जिल्हा बँकेने आ. प्रकाश अबीटकर यांचे खाते सरकारकडे पाठविले होते.त्याबाबतची वस्तुस्थिती मंत्री श्री सुभाष देशमुख यांनी सांगितली.
आ. प्रकाश अबीटकर यांचा कर्जमाफीसाठी अर्ज आला नव्हता , अबीटकर या आडनावाचे एकूण ३७ अर्ज आहेत. तसेच प्रकाश अबीटकर या नावाने सुध्दा एक अर्ज आहे पण तो आमदार यांचा नाही, ते खाते बँक ऑफ इंडियातील असून, हे प्रकरण कोल्हापूर जिल्हा बँकेशी संबंधित आहे.अर्ज नसतानाही कोल्हापूर जिल्हा बँकेने आ. प्रकाश अबीटकर यांचे खाते या योजनेच्या लाभासाठी सरकारकडे पाठविले होते.
एक अर्ज प्रकाश सुतार यांचा आहे. या व्यक्तीचा अर्ज , आधार क्रमांक, जन्मतारीख, बचत खाते, बँक आय एफ एस सी कोड, अशा निकषांवर तपासण्यात आला मात्र कुठलेच रेकार्ड मॅच होत नसल्याने कर्जखाते तपासण्यात आले. प्रकाश अबीटकर आणि प्रकाश सुतार या दोघांचाही एकच कर्जखाते क्रमांक कोल्हापूर जिल्हा बँकेने दिला आहे. त्यामुळे आ. प्रकाश अबीटकर यांचे नाव यादीत आले. हे दोन्ही खाते १८ महिन्यांचे पीककर्ज घेतलेली खाती आहेत. दोघांनीही पुर्ण कर्ज परत केले आहे.
आमदार प्रकाश अबिटकर यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आ. प्रकाश अबीटकर यांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने ही चूक दुरूस्त करण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्हा बँकेला देण्यात येतील.