पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा असलेला विश्वास यामुळेच विजय

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा असलेला विश्वास यामुळेच विजय

नागपूर : गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये भाजपाला मिळालेले यश हे जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

देशातील जनता हि भाजपासोबत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासकारण देशाला पुढे घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.  विकास आणि विश्वासाला गुजरात मधिल जनतेने पाठिंबा दिला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज विधानभवन परिसरात भाजपच्या आमदारांनी विजयोत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी जोरदार घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला. हा जल्लोष सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Previous articleएकनाथ खडसेंनी सरकारला पुन्हा खडसावले
Next articleपाणीपुरवठा विभागात चिरीमिरी शिवाय टेंडर मंजूरच होत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here