समृद्धी महामार्गावर तब्बल ३१ टोलनाके ?
पुणे : विधानसभा निवडणूकीपूर्वी टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “स्वप्नातील प्रकल्प असलेल्या मुंबई – नागपूर या समृध्दी महामार्गावर तब्बल ३१ टोल नाके प्रस्तावित आहेत, अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. पुण्यातील “माहिती अधिकार कार्यकर्ते” आणि टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी मागितलेल्या माहितीमध्ये हि बाब उघड झाली आहे.
टोलमुक्त महाराष्ट्राची हाक देवून राज्यातील सत्तेत आलेल्या भाजप सरकारने मुंबई -नागपूर या समृध्दी महामार्गाची घोषणा केल्यानंतर अनेक कारणांनी हा महामार्ग वादात सापडला असताना या समृध्दी महामार्गासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नव्याने होत असलेल्या मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर तब्बल ३१ टोल अस्तित्वात येणार आहेत, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते व टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी मागितलेल्या माहितीमुळे उजेडात आली आहे. आगामी काळात समृद्धी महामार्ग हा प्रकल्प तयार झाला तरी त्यावरून मुंबई ते नागपूर असा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सुमारे १ हजार ५०० ते २ हजार रुपये एवढा “टोल” मोजावा लागणार आहे. मुंबई ते नागपूर असा जवळपास ७०० किलो मीटरचा समृद्धी महामार्ग तयार होत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांचा “स्वप्नातील प्रकल्प ’ म्हणून हा प्रकल्प ओळखला जात आहे.हा प्रकल्प जमीन अधिग्रहणाच्या वादावरून चर्चेत असून, विविध ठिकाणी शेतक-यांनी या महामार्गाला विरोध करीत आंदोलने केली आहेत. हा प्रकलाप पाच भागांमध्ये तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची घोषणा करण्यात आल्यानंतर या महामार्गावरील असलेल्या टोलनाक्यांची माहिती जाहिर करण्यात आली नव्हती मात्र या उघड झालेल्या माहितीमुळे विरोध वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.