२०१७….मुख्यमंत्र्यांसाठी “अच्छे वर्ष”

२०१७….मुख्यमंत्र्यांसाठी “अच्छे वर्ष”

 

मुंबई : २०१७ साल हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी यशाची भरारी घेणारे वर्ष असेच म्हणावे लागेल. मुंबई, नागपूरसह १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदा आणि नगरपरिषद , नगरपालिका निवडणूका या सरत्या वर्षाला झाल्या.या निवडणूकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या करिश्म्यामुळे भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला तर ; राज्यातील सर्वसामान्य जनतेचे आशिर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याने तीन ठिकाणी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतुन ते बचावले.

राज्यातील वर्षभरातील राजकीय घडामोडींचा थोडक्यात आढावा

२०१४ पर्यंत शिवसेना हा पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत होता. मात्र गेल्या निवडणुकीत राज्यात भाजपने मुसंडी मारून १२२ जागा जिंकल्या आणि सेनेला ६३ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे मोठ्या भावाच्या भूमिकेत भाजप पक्ष वावरू लागला आहे. या दोन्ही पक्षात विविध मुद्यांवर धुसफुस आजही कायम आहे.

मेहता आणि देसाईंवर आरोप

राज्यातील फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप झाले. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर कथित घोटाळ्याचा आरोप करून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली. शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही जमीन अधिसूचित केल्या प्रकरणी आरोप करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनांमुळे यंदा काळजी निर्माण केली. निलंगा येथे त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले; तर अलिबागमध्ये त्यांचा अपघात सुदैवाने टळला असेच म्हणावे लागेल. अन्य एक घटना नुकतीच नाशिक मध्ये घडली.

राणे यांचा राजीनामा

काँग्रेसमध्ये नाराज असलेले नारायण राणे यांनी अखेर काॅग्रेसचा राजीनामा देत स्वाभिमान या राजकीय पक्षाची घोषणा केली. त्यांनी एन.डी.एमध्ये प्रवेश केला मात्र त्यांच्या मंत्रिपदाला शिवसेनेचा अडसर आहे.
निवडणूक वर्ष

सरत्या वर्षात ग्रामीण आणि शहरी भागातील निवडणुका लक्षवेधी ठरल्या. मुंबई, नागपूरसह १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका या सरत्या वर्षात झाल्या. राज्यात फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज संस्थांची रणधुमाळी झाली. भाजपने आठ महानगरपालिका जिंकून शहरी भागावरील आपली पकड मजबूत केली. शिवाय शिवसेनेबरोबर लढून १३ जिल्हा परिषदा काबीज करत ग्रामीण भागात शिरकाव केला. काँग्रेस-राष्ट्रवादीने ११ जिल्हा परिषदा जिंकल्या मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नांदेड महानगरपालिकेत अशोक चव्हाणांनी बाजी मारून काँग्रेसची सत्ता राखली.

 

 

 

 

Previous articleराधेश्याम मोपलवारांची चौकशी हा एक ‘फार्स’च!
Next articleआंदोलन यशस्वी करण्यासाठी भुजबळ समर्थकांची जोरदार तयारी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here