एकाच दिवसात ३१४ हाॅटेलवर कारवाई !

एकाच दिवसात ३१४ हाॅटेलवर कारवाई !

मुंबई :  मोजो बिस्त्रो पब आणि वन अबव्ह रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर २४ तासांमध्ये मुंबईतील तब्बल ३१४ उपहारगृह, मॉल्स, हॉटेलच्या बेकायदा बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला आहे. तसेच सात उपहारगृहांना टाळे लावण्यात आले आहे.

कमला मिल कंपाउंडमधील मोजो बिस्त्रो पब आणि वन अबव्ह रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत १४ बळी गेल्याने सर्वच स्तरांतून मुंबई महानगरपालिकेला लक्ष्य करण्यात येत आहे. बेकायदा बांधकामांकडे आतापर्यंत महानगरपालिका अधिकारी डोळेझाक करीत होते. मात्र या दुर्घटनेनंतर सर्वच पालिका अधिकारी आज रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले. काल सुरु केलेल्या या कारवाईमधून गेल्या २४ तासांमध्ये रेस्टॉरंट व पबवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरातील तब्बल ६२४ ठिकाणी तापसणी केल्यानंतर एकूण३१४ ठिकाणी अनियमितता आढळून आल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये जिमखाने, गच्चीवरील रेस्टॉरंट, पब, उपहारगृहांचा समावेश आहे. ही सर्व बेकायदा बांधकामे महानगरपालिकेने जमीनदोस्त केली असून, सात उपहारगृहांना सील करण्यात आले. तर ४१७ पेक्षा अधिक सिलेंडरदेखील जप्त करण्यात आले आहेत.या बेकायदेशिर कामावर कारवाईकरण्यासाठी २४ विभागांमध्ये प्रत्येकी तीन चमू तयार करण्यात आले होते. यामध्ये संबंधित खात्यातील कर्मचारी-अधिकारी यांचा समावेश होता. घतसेच अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते.आजच्या कारवाईत महानगरपालिकेचे सुमारे एक हजार कर्मचारी-अधिकारी आज कार्यरत होते.

Previous articleबाळराजें’च्या मित्रांना वाचवण्यासाठी तोंडदेखली कारवाई
Next articleसरकारचे अपयश झाकण्यासाठी आशिष शेलारांकडून बिनबुडाचे आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here