महाराष्ट्राचे सुपुत्र विजय गोखले नवे विदेश सचिव
नवी दिल्ली : मुळचे पुण्याचे असणारे विजय केशव गोखले यांची आज विदेश सचिवपदी नियुक्ती झाली आहे. हा बहुमान मिळविणारे ते दुसरे महाराष्ट्रीयन व पुणेकर ठरले आहेत.
विद्यमान विदेश सचिव डॉ. जयशंकर यांचा कार्यकाल २८ जानेवारी रोजी पूर्ण होत असून, आज केंद्र शासनाने विदेश मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून विजय गोखले यांची निवड झाल्याची घोषणा केली. गोखले हे भारतीय परराष्ट्र सेवेच्या १९८१ तुकडीचे अधिकारी आहेत. हॉगकॉग, हनोई, बिजिंग येथे त्यांनी भारताचे राजदूत म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे.यापूर्वी मुळचे पुण्याचे राम साठे यांनीही विदेश सचिव पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
.