सर्वांनी शांतता बाळगण्याचे शरद पवार यांचे आवाहन
मुंबई : वढू येथिल घटनेला २०० वर्षे पूर्ण असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय गर्दी करणार याची प्रशासनाला कल्पना होती.त्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याची गरज होती असे सांगतानाच, आता या घटनेला कोणताही रंग देऊ नये. येथिल प्रकरण वाढवू नये. घडलेला प्रकार अयोग्य असल्याने आता सर्वांनी शांतता बाळगावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
भीमा कोरेगाव येथे आजपर्यंत कधीही कसलाही संघर्ष झाला नाही. या घटनेला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त साहजिकच या ठिकाणी जास्त गर्दी होईल याची प्रशासनालाही कल्पना होती.त्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याची गरज होती असे सांगतानाच, आता या घटनेला कोणताही रंग देऊ नये. येथिल प्रकरण वाढवू नये. घडलेला प्रकार अयोग्य असल्याने आता सर्वांनी शांतता बाळगावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.भीमा-कोरेगाव प्रकरणी शरद पवार यांनी आपली भूमिका मांडताना समाजातील सर्वच स्तरातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पवार म्हणाले की, म्हणाले, या घटनेविषयी आपण वढू गावातील लोकांशी संवाद साधला असून, पुणे शहरातून आलेल्या हिंदूत्ववादी संघटनांनी वढू येथे येऊन चिथावणी दिल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले. वढू येथे बाहेरून आलेल्या लोकांनी गोंधळ केला. अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु स्थानिक लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या लोकांचा या घटनेशी काहीही संबंध नाही त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असल्याचे पवार यांनी सांगितले.
वढू मध्ये दोन दिवसांपासून गर्दी जमत होती. वढू येथिल घटनेला २०० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे जनतेला या ठिकाणी येण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येणार याची कल्पना होती. दोन दिवसांपासून या ठिकाणचे वातावरणातही अस्वस्थ होते. त्यामुळे योग्य ती दक्षता घेण्याची गरज होती. ती न घेतल्यानेमुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे पवार म्हणाले. पोलिसांनी वढू येथिल घटनेच्या तळापर्यंत जायला हवे असे सांगतानाच, राज्य सरकारनेही याची चौकशी करावी, अशी मागणी पवार यांनी करून सर्वांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.