समाज माध्यमातुन अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार

समाज माध्यमातुन अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार

शांतता राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई :  भीमा-कोरेगावमध्ये काल गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली आले. यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला असून, ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली आहे. त्याचबरोबर, समाज माध्यमातुन अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, या घटनेतील मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक लढाईला  २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वढू येथे राज्यभरातून लाखो अनुयायी आले होते. वढू येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, दोन समाजात तेढ निर्माण करुन हिंसाचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करुन शांतता राखावी असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे या घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेत ज्या युवकाचा मृत्यू झाला. त्याची  सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार असून, मृताच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून दिली जाणार आहे. राज्यभरात ज्याठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या, त्याठिकाणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच, अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समाज माध्यमातून पसरवणाऱ्यांवर कारवाई करु, असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Previous articleसमाजविघातक शक्तींचा कुटील राजकीय डाव हाणून पाडा
Next articleहिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो धावणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here