एसटी बसेस तुमच्याच आहेत, त्यांची तोडफोड करु नका…!

एसटी बसेस तुमच्याच आहेत, त्यांची तोडफोड करु नका…!

दिवाकर रावते याचे आंदोलकांना आवाहन

मुंबई : एसटी बसेस तुमच्याच आहेत, कृपया त्यांची मोडतोड करुन सर्वसामान्य माणसांचे दळणवळणाचे हक्काचे साधन हिरावून घेऊ नका.” असे आवाहन परिवहन व एस.टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे. राज्यभरात सुमारे २३५ एसटींचे नुकसान झाल्याची माहिती समजते तर मुंबईत २० बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे.

भीमा कोरेगांव संदर्भात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्री.रावते
यांनी आंदोलनकर्त्यांचा भावना व्यक्त करण्याचा हक्क आम्हाला जरी मान्य असला तरी त्या व्यक्त करीत असतांना “सर्वसामान्यांच्या दळणवळणाचे हक्काचे साधन असलेल्या एसटीला वेळोवेळी आंदोलकांकडून ‘लक्ष्य’ केले जाते. त्यामुळे दररोज एसटी वर अवलंबून असणारी सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो.एसटीचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण त्यापेक्षा प्रवाशांना होणारा त्रास अत्यंत
विदारक असून कृपयास आंदोलकांनी जाळपोळ, दगडफेक रास्तारोको या माध्यमातून एसटीला लक्ष्य करुन त्याची मोडतोड करु नये असे भावनिक आवाहन केले आहे.

Previous articleशांतता, संयम तसेच कायदा-सुव्यवस्था पाळा
Next articleवैचारिक कट्टरवादाबाबत बोटचेप्या भूमिकेमुळे समाजकंटकांना बळ!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here