महाराष्ट्र बंद : ठाण्यात जमावबंदी
मुंबई : भीमा- कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहेत. मुंबईत चेंबूर, कुर्ला, टिळक नगर भागतील काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तर; गिरगाव, ग्रॅण्टरोड, चर्चगेट भागातील काही शाळा सुरु आहेत. ठाण्यात ठिकठिकाणी जोरदार आंदोलन सुरू आहे. तीन हाथ नाका येथे तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.ठाण्यात उद्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू आहेत. बेस्ट बसेसची वाहतुक सुरळीत सुरू असून, ठाणे, मुंबईतील काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र मीरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र बंदचा कसलाही परिणाम जाणवत नाही. रिक्षा-बस सेवा सुरू आहे. रेल्वे स्थानकांवर नेहमीप्रमाणे प्रवाशांची गर्दी असल्याचे चित्र आहे उल्हासनगरमध्ये मात्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. बहुतांश शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.यवतमाळमध्ये शाळा, मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात येवून या बंदला पाठिंबा देण्यात आला आहे. लोहारा येथे शाळेच्या बसवर दगडफेक करण्यात आली आहे.औरंगाबादमध्ये काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा मध्यरात्री पासून २४ तासांसाठी बंद करण्यात आली आहे.
पालघरमध्ये भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ शहरात सर्व बस-रिक्षा बरोबरच दुकाने, बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. वर्ध्यातील शहरातील काही आज शाळाना सुट्टी जाहीर करण्यात येवून बाजार पेठ बंद ठेवण्यात आली आहे.काल झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर बारामती व साताराकडे जाणाऱ्या बससेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.नागपूरमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बंदमुळे शहरातील अनेक शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.पंढरपुरमध्येही बाजारपेठांसह एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.