जिग्नेश मेवाणीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली

जिग्नेश मेवाणीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली

मुंबई : भीमा कोरेगाव येथिल घटनेनंतर झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदयांचा प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. भाईदास सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. मात्र परवानगी नाकारल्याने या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.

भीमा कोरेगाव येथील घटनेला २०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यातील शनिवारवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांनी संबोधित केले होते. आज विलेपार्ल्यातील कार्यक्रम आयोजित करण्यावर छात्रभारती संघटना ठाम असून, परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका छात्रभारतीने घेतली आहे. त्यामुळे विलेपार्ल्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Previous articleप्रकाश आंबेडकरांनी राजकीय जीर्णोद्धारासाठी दंगलीचा वापर करू नये
Next articleराज्यातील काॅग्रेसचे नेते राहुल गांधीच्या भेटीला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here