मुख्यमंत्री विरोधात असतील तरच निवडणूक लढणार !
नाना पटोले यांचे आव्हान
मुंबई : भाजपाला सोडचिट्टी देत काँग्रेच्या वाटेवर असलेले माजी खासदार नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांनाच आव्हान दिले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल विरोधात असतील तरच लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार अन्यथा निवडणूक लढणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
भंडारा गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने या ठिकाणची पोटनिवडणूकीची घोषणा लवकलच होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांनी आज दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांची लवकरच घरवापसी होणार अशी चर्चा आहे.त्यांनी आज मुख्यमंत्री आणि माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनाच निवडणूक लढवण्याचे खुले आव्हान दिले आहे. पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल विरोधात असतील तरच पोटनिवडणूक लढवणार आहे. अन्यथा निवडणूक लढणार नाही.