मिलिंद एकबोटे आणि  संभाजी भिडे यांना अटक करा

मिलिंद एकबोटे आणि  संभाजी भिडे यांना अटक करा

प्रकाश आंबेडकरांची मागणी

मुंबई :  भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी हिंदू एकताचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अटकेची मागणी पुन्हा केली आहे.

कोरेगाव भीमा घटनेप्रकरणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि मागणी केली. सरकारकडून आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारने दिलेल्या आश्वासनांची लवकर पूर्तता करावी. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. दलित तरुणांची धरपड तातडीने थांबवावी, तसेच कोम्बिंग ऑपरेशन थांबविण्याची विनंती सरकारकडे करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी केली. काल झालेले आंदोलन फक्त दलित समुदायांचे आंदोलन नव्हते तर यामध्ये इतर समाज घटकांचाही सहभाग होता असे त्यांनी सांगितले.

 

 

Previous articleमुख्यमंत्री…. सोशल मिडीयावरील विकृत प्रचार थांबवा
Next articleविकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here