कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक

कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक

आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : मुंबईसह राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. या कुत्र्यांच्या चाव्याने झालेल्या रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूची भयानकता पाहता भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक असून यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन धोरण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले.

पालघर येथील दहा वर्षांच्या मुलाला कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी ही  माहिती दिली. पालघर येथील या मुलास त्याला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून नेण्यास नकार  देणाऱ्या डॉक्टरला निलंबित केले आहे. त्याचबरोबर १०८ क्रमांकासाठी सेवापुरवठादार म्हणून काम करणाऱ्या कंपनीवर देखील चौकशीअंती कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले की, मुंबईसह राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जटील बनला आहे. यावर अशा कुत्र्यांची नसबंदी करणे  हा प्रतिबंधात्मक उपाय असला तरी पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे. पिसाळलेला कुत्रा चावला किंवा त्याचा नख जरी लागला तरी रेबीज होतो आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची भयानकता पाहून लसीकरण मोहिम घेणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Previous articleपाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयाचे स्वागत
Next articleबंद काळात एसटीचे तब्बल २० कोटीचे नुकसान 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here