बंद काळात एसटीचे तब्बल २० कोटीचे नुकसान
मुंबई : एसटीला भीम-कोरेगाव च्या घटनेमुळे झालेल्या आंदोलनात तब्बल २० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. जरी आथिॆक नुकसान झाले असले तरी, आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत आम्ही एसटीचे झालेले नुकसान आंदोलनकर्त्यांकडून न घेता एसटी स्वत: सोसेल असे प्रतिपादन परिवहन व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श् दिवाकर रावते यांनी केले आहे.तसेच या काळात एसटीची वाहतुक ठप्प झाल्याने प्रवाशांचे जे अतोनात हाल झाले त्याबध्दल त्यांनी एसटी महामंडळाचा अध्यक्ष यानात्याने ‘ दिलगिर ‘ व्यक्त केली आहे.
आंदोलनात सलग दोन दिवस एसटीच्या २१७ बसेसची मोडतोड झाली असून त्याचे सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या बंद काळात २५० आगारापैकी २१३ आगारक्षेत्रीतील बहुतांश एसटीची वाहतूक ठप्प झाल्या मुळे १९ कोटी रुपयाचं महसूल बुडाला आहे. हे झालेले नुकसान भरून न निघणारे असून आंदोलन काळात तोडफोड झालेल्या बसेस भविष्यात दुरुस्त होऊन रस्त्यावर सुरळीत धावेपर्यंत एसटीला तिच्या दैनंदिन महसूला पासून वंचित राहावे लागणार आहे. त्याचा सध्या स्थितीला अंदाज वर्तविणे कठीण आहे. अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.