साई चरणी १४ कोटी ८२ लाख रोख ; सोने चांदी आणि विदेशी चलन दान !
शिर्डी : चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्ताने २३ डिसेंबर ते १ जानेवारी याकाळात सुमारे ९ लाख साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधी दर्शन घेतले असून, याकालावधीत सुमारे १४ कोटी ८२ लाख रोख तर; सोने ,चांदी, डेबिट-क्रेडीट कार्ड,ऑनलाईन, चेक-डिडी, मनिऑर्डर व परकीय चलन देणगी स्वरुपात प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.
नाताळच्या सुट्टया आणि चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्ताने २३ डिसेंबर ते ०१ जानेवारी याकाळात सुमारे ९ लाख साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधी दर्शन घेतले असून दिनांक याकालावधीत सुमारे १४ कोटी ८२ लाख रोख, सोन-चांदी, डेबिट-क्रेडीट कार्ड,ऑनलाईन, चेक-डिडी, मनिऑर्डर व परकीय चलन अशा स्वरूपात देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.या काळात १ लाख भाविकांनी सशुल्क दर्शनाचा लाभ घेतला आहे. दक्षिणा पेटीमध्ये ८ कोटी ३४ लाख, देणगी काऊंटर ३ कोटी ८ लाख २९ हजार, डेबीट-क्रेडीट कार्ड व्दारे १ कोटी २७ हजार, ऑनलाईनव्दारे ६४ लाख २३ हजार, चेक-डीडीव्दारे ८६ लाख १२ हजार, मनीऑर्डरव्दारे १० लाख २ हजार असा देणगी स्त्रोतचा समावेश असून ११७७.१७० ग्रॅम सोने व १९,९५५ ग्रॅम चांदीचा यात समावेश आहे. तसेच अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सौदी अरेबिया, दक्षिणअफ्रिका,श्रीलंका,नेपाळ,ओमान, कुवैत, केनिया, मॉरिशस, व्हियतनाम, थायलंड, अरब अमिरात, कतार, चीन व जपान अशा २१ देशातील साईभक्तांनी अंदाजे रुपये ४१ लाख २२ हजार किंमतीचे परकीय चलन संस्थानच्या दक्षिणा पेटीत दान करण्यात आहे.तसेच याकालावधीत श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईप्रसादालयात ६ लाख ५९ हजार ३८० साईभक्तांनी मोफत प्रसादभोजनाचा लाभ घेतला. तर १ लाख २४ हजार भाविकांनी नाष्टा पाकीटाचा लाभ घेतला. याकालावधीत दर्शनरांगेमध्ये ९ लाख १४ हजार भाविकांनी मोफत बुंदी प्रसाद पाकीटाचा लाभ घेतला असून ५ लाख ६६ हजार ९०० लाडू प्रसाद पाकीटांची विक्री झाली असून त्यातून संस्थानला १ कोटी ४१ लाख ७२ हजार ५०० रुपये प्राप्त झाले आहे. याकाळात श्री साईबाबा संस्थान प्रकाशित ५५ हजार ४३२ दैनंदिनीची विक्री झाली असून दिनदर्शिका व इतर साहित्यांव्दारे ८८ लाख ४० हजार रुपये प्राप्त झाले आहे. लाडू, दैनंदिनी,दिनदर्शिका इत्यादींची विक्री ना नफा ना तोटा या तत्वावर केली जात असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.
आज मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.