वसंत डावखरे यांचे निधन

वसंत डावखरे यांचे निधन

मुंबईः विधान परिषदेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने त्यांनी बॉम्बे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. उद्या ठाण्यामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विधानपरिषदेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंसत डावखरे यांचे आज बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन झाले. डावखरे यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक वजनदार नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना गेल्या महिन्यात बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांची भेट घेतली होती. वसंतराव डावखरे यांच्यावर वर्षभरापासून उपचार सुरु होते. मुत्रपिंडाच्या विकाराने ते ग्रस्त होते. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात मुत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना संसर्गाचा त्रास झाल्यामुळे गेली अनेक दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ होती.

Previous articleआ.भारती लव्हेकर यांच्यासह राज्यातील १५ कर्तृत्ववान महिलांना “फर्स्ट लेडी” पुरस्कार
Next articleराजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारा एक उमदा नेता आपण गमावला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here