भीमा कोरेगाव घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा

भीमा कोरेगाव घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा

संभाजी भिडे यांची मागणी

सांगली : भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले संभाजी भिडे यांनी आज एक प्रसिद्धी पत्रक जारी करून या हिंसाचारातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. भीमा कोरेगाव मधिल दंगलीत माझा हात होता व त्याला मी कारणीभूत आहे,हा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप निराधार असून, सरकारने या घटनेची पाळेमुळे शोधून चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी संभाजी भिडे यांनी आज पत्रकाद्वारे केली आहे.

संभाजी भिडे यांनी जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या बीजमंत्राच्या आधारावर राष्ट्रजागृती करण्याचे काम आम्ही करतो. “कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत मी होतो आणि त्याला कारणीभूत असल्याचा  प्रकाश आंबेडकर यांचा आरोप चुकीचा आहे. त्यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेप्रमाणे गावोगावी त्यांच्या अनुयायांनी तोडफोड करून वाहने, घरे, दुकाने आणि सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस केला आहे. या सर्व गोष्टींना कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींमध्ये माझे नाव कारणीभूत असल्याचे आंबेडकर बोलले आहेत. त्यांनी निराधार आरोप करून माझ्यावर अटकेची कारवाई करून गुन्हा नोंद करून, मला याकूब मेमनची वाट दाखवावी, अशी मागणी केली आहे. या घटनेची म्हणजेच बनावाच्या खोलात जाऊन पाळेमुळे शोधून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जे अपराधी असतील त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी माझी मागणी आहे.असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Previous articleराजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारा एक उमदा नेता आपण गमावला
Next articleभिडे गुरूजींच्या विरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here