थांबण्याची सवय नसल्याने लवकरच मंत्रिमंडळात असेल
नारायण राणे
सिंधुदूर्ग : मला दिर्घकाळ थांबण्याची सवय नाही असे सांगतानाच मी लवकरच मंत्रिमंडळात असेल असे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे आज कुडाळ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नसल्याने मी लवकरच मंत्रिमंडळात असेल, असे वक्तव्य त्यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा दहा वर्ष मागे गेल्याची टिका करतानाच, निवडणुकांच्या दरम्यान जाहीर करण्यात आलेला जाहीरनामा व घोषणांची अंमलबजावणी अजून करण्यात आलेली नाही. जिल्ह्यामधिल रस्ते खड्डेमय झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. याचबरोबर एमआयडीसीचे काम सुरू नाही. जिल्ह्यातील सर्वच विकास कामे ठप्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.याला जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदार असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.
पालकमंत्र्यांचे अधिकारी ऐकत नाहीत हे दुर्दैव असून गेल्या तीन वर्षात विकास बंद असल्याचे सांगत, पालकमंत्री निष्क्रिय असल्याची टीका त्यांनी केली. कोकणात होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला नारायण राणे यांनी विरोध केला. मंत्रिपदाबद्दल सूचक वक्तव्य करताना राणे म्हणाले की, मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळात समावेश झालेला असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या १ फेब्रुवारी पासून स्वाभिमान पक्षाची सभासद नोंदणी सुरु होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभेच्या आणि खासदारकीची जागा पक्षाकडून लढविल्या जाणार असून या जागावर आम्ही विजयी होवू अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वाभिमान पक्षाचे संपर्क अभिमानही लवकरच सुरू होणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.