कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही ;भीमा कोरेगाव येथील हल्लखोरांना अटक करा
ना रामदास आठवले
मुंबई : भिमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या कारस्थानामागे कोणीही असो त्यांचा शोध घेऊन कारवाई झाली पाहिजे. कायद्या पेक्षा कोणी मोठा नाही असे सांगत पुण्यात शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेचा धागा पकडत समाज तोडण्यासाठी नव्हे तर समाज जोडण्यासाठी एल्गार पुकारावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. येथील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भीमा कोरेगाव येथे निरपराध आंबेडकरी जनतेवर हल्ला झाल्यानंतर त्याच्य् निषेधार्थ आंबेडकरी जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आंबेडकरी जनतेच्या एकजुटीतून महाराष्ट्र बंद चे आंदोलन यशस्वी झाले. त्यात सर्वच गटांचे कार्यकर्ते होते. रिपब्लिकन कार्यकर्ते ही आघाडीवर होते. या आंदोलनातुन समाजाच्या ऐक्याची ताकद समोर आल्याने सुरू झालेल्या रिपब्लिकन ऐक्याच्या मागणीला आपला सदैव पाठिंबा आहे.मात्र ऐक्य हे केवळ चार गटांचे नसावे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात सर्व गटांचे ऐक्य व्हावे. आता समाजात प्रकाश आंबेडकरांचे नाव मोठया प्रमाणात पुढे आले आहे त्यामुळे त्यांनी ऐक्यात मोठी भूमिका घ्यावी .मी कार्यकर्ता म्हणून छोटी भूमिका घ्यायला तयार आहे. मात्र रिपाइं ऐक्य करताना ते केवळ चार गटांचे नसावे तर सर्व गटांचे असावे तसेच त्यासोबत अल्पसंख्यांक ओबीसी आणि मराठ्यांनाही सोबत घेऊन व्यापक ऐक्य करावे असे आवाहन आठवले यांनी केले आहे.रिपब्लिकन ऐक्य बहुमताने जो राजकीय निर्णय घेईल तो आपल्याला मान्य राहील .मागे आम्ही रिपब्लिकन चे चार खासदार लोकसभेत असताना अटलबिहारी वाजपेयींचे सरकार वाचविण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी मला गळ घातली होती.मात्र मी तेंव्हा भाजप ला तीव्र विरोध केला .आता प्रकाश आंबेडकर विरोध करीत आहेत.
महाराष्ट्र बंद च्या आंदोलनात जरी प्रकाश आंबेडकरांचे नाव पुढे आले असले तरी त्या बंदला रिपाइंचा पाठिंबा असल्याने रिपब्लिकन कार्यकर्ते त्यात आघाडीवर होते.आता काही काळ प्रकाश आंबेडकरांचे नाव पुढे आले असले तरी उडी घेऊन पुढे कसे यायचे हे या पँथर ला चांगले ठाऊक आहे असे आठवले म्हणाले.आपले नेतृत्व हे मंत्रीपदामुळे नाही .आपण कार्यकर्ता म्हणून काम करीत असून त्यामुळे लोक आपल्या सोबत आहेत.महाराष्ट्र बंद आंदोलनात निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज आपणास दिले आहे असे आठवले यांनी सांगितले.जिग्नेश मेवाणी यांनी वरिष्ठ नेत्यांबद्दल आदराने बोलले पाहिजे. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या नेत्यांबद्दल विरोध जरी केला तरी त्यांचा आम्ही एकेरी उल्लेख कधी केला नाही; उलट आदराने उल्लेख केला आहे. जिग्नेश मेवाणीने नेहमी कसे बोलायचे त्याने माझे ऐकून बोलत राहिला तर त्याच्यावर चा गुन्हे काढायला मुख्यमंत्र्यांना सांगतो असे मिश्किल शैलीत आठवले म्हणाले. येत्या 13 जानेवारी रोजी पुण्यात रिपब्लिकन पक्षातर्फे सामाजिक सलोखा परिषद आयोजित करणार आहोत.
आंबेडकरी विचार घेऊन राजकीय आणि सामाजिक पातळीवर पुढे जाण्यासाठी आपल्याला अन्य कोणत्याही समाजाशी वैर भावना न ठेवता मैत्रिभावना ठेवावी लागेल. अन्य समाजबद्दल तरुणांची माथी भडकविण्यापेकशा त्यांना संयमाने प्रगती करायला प्रोत्साहन दिले पाहिजे. मराठा समाजाशी आपल्याला मैत्री करणे हे दोन्ही समाजाच्या हिताचे आहे. भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक झालीच पाहिजे मात्र त्यासाठी सर्व मराठा समाजाला वेठीस धरण्याची आमची भूमिका नाही. अट्रोसिटी कायदा बदलण्याची कोणी कितीही मागणी केली तरी कधीही बदलला जाणार नाही . अट्रोसिटी चा गैरवापर होण्यास आमचा विरोध आहे .पण मराठा समाजाचे दोन गट परस्पराविरुद्ध दलितांचा वापर अट्रोसिटी नोंदविण्यासाठी करतात. अट्रोसिटी चे गुन्हे आकाशात पडत नाहीत त्यासाठी डी वाय एस पी अधिकारी तपासणी करतो त्याला त्यात तथ्य वाटल्यावरच अत्रिसिटी चा गुन्हा नोंदविला जातो त्यामुळे दलितांची घरे जाळली मारहाण केली अत्याचार झाले तर अट्रोसिटी लागते सवर्ण समाजाने दलितांवर अत्याचार करू नये .अत्याचार केले नाही तर अट्रोसिटी चा गुन्हा नोंदविला जाणार नाही. असे आठवले म्हणाले. दलितांवर अत्याचार होणाऱ्या कारणांमध्ये आरक्षण हे एक कारण आहे. त्यामुळे मराठा समाजातील आर्थिक दुर्बलांना आरक्षण दयावे अशी मी सर्वप्रथम मागणी केली आहे .दलित आदिवासी ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे . आपल्या या मागणीमुळे मला टीकेचे धनी व्हावे लागले आहे मात्र कितीही कोणी टीका केली तरी माझी भूमिका ही आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण देण्याची राहील असे ना रामदास आठवले म्हणाले.
या वेळी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ; महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर ; राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम ; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ; काकासाहेब खंबाळकर; सुरेश बरशिंग एम एस नंदा रिपाइं चे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे तानसेन ननावरे पुण्याचे उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे आसित गांगुर्डे परशुराम वाडेकर कांतिकुमार जैन मन्सूर बलूच डॉ विजय मोरे तसेच विजय वाकचौरे ;माजी आमदार अनिल गोंडाने ;सुधारकर तायडे रमेश गायकवाड हेमंत रणपिसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रसिद्धिप्रमुख