अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदी कायम

अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदी कायम

मुंबई : अखिल भारतीय काॅग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यातील प्रदेशाध्यक्ष आणि विभागीय अध्यक्ष हेच यापुढे कायम असतील असा निर्णय आज घेतल्याने काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि मुंबई काॅग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम हे आपल्या पदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अखिल भारतीय काॅग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी पत्रक काढून वरील माहिती दिली आहे.

राहुल गांधी यांनी काॅग्रेस अध्यक्षाची सुत्रे हाती घेतल्यानंतर परवा प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण आणि मुंबई काॅग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी राहुल गांधी यांची सदिच्छा भेट घेतली होती. राहुल गांधी यांच्या आजच्या निर्णयामुळे खा.अशोक चव्हाण आणि संजय निरूपम हे आपापल्या पदावर कायम राहणार आहेत. पुढील संघटनात्मक निवडणूका होईपर्यंत हा निर्णय कायम असणार आहे.

Previous articleदेशात उच्च शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर
Next articleदंगली घडवणारे बाहेरचे कोण ? सरकारने त्यांचा शोध घ्यावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here