१ फेब्रुवारीपासून मनोरा आमदार निवास रिकामे करणार

१ फेब्रुवारीपासून मनोरा आमदार निवास रिकामे करणार

मुंबई  : मनोरा आमदार निवास येथे नवीन आमदार निवासाची इमारत बांधण्यासाठी सध्याची इमारत पाडण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या १ फेब्रुवारीपासून मनोरा आमदार निवासातील कक्ष रिकामे करण्याचा निर्णय आज झालेल्या मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी उच्चाधिकार समितीच्या बैठकित घेण्यात आला. मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीसंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक समिती प्रमुख व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटीलसंसदीय कार्यमंत्री गिरीश बापटमुख्य सचिव सुमित मलिकसार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह,विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशनच्या (एनबीसीसी) मार्फत करण्यात येणार आहे. पुनर्बांधणीसाठी पर्यावरण विषयक व इतर विविध परवान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एनबीसीसीला सहकार्य करावे व लवकरात लवकर परवाने मिळवून द्यावेतअसे यावेळी समितीच्या वतीने निर्देश देण्यात आले. तसेच बांधकाम लवकर सुरू करण्यासाठी १ फेब्रुवारीपासून आमदार निवासातील कक्ष रिकामे करावेत व तेथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. फडणवीस म्हणालेमनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचे काम कमी कालावधीत व्हावेयासाठी वेगाने प्रक्रिया कराव्यात. तसेच या बांधकामासाठी जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.

Previous articleविशाल कारिया, बाळा खोपडेची सीबीअाय चौकशी करण्यात यावी – नितेश राणे यांची मागणी
Next articleआर्थिक मागासवर्गाच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here