राज्याला विकास आणि एकोप्याच्या वातावरणाची गरज

राज्याला विकास आणि एकोप्याच्या वातावरणाची गरज
मुख्यमंत्री

मुंबई  :  भिमा कोरेगाव सारख्या घटनांची राज्याला गरज नसून, या पुरोगामी महाराष्ट्रात प्रगती आणि विकास यांच्या मार्गाने सामाजिक एकोप्याचे वातावरण आवश्यक आहे. या कामी माध्यमे आणि पत्रकारांची भुमिका समाजाचे घटक म्हणून अत्यंत महत्वाची आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एबीपी माझाच्या नागपूरच्या प्रतिनिधी सरिता कौशिक, औरंगाबाद लोकसत्ताचे सुहास सरदेशमुख, आणि इंडियन एक्सप्रेसचे संदिप आशर यांना यावेळी उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी बोलताना राज्यपालांनी मराठीतून काही काळ भाषण केले. ते म्हणाले की मंत्रालय आणि विधानभवनात वार्ताकन करणारे पत्रकार कोणत्या महत्वाच्या जबाबदा-या सांभाळतात ते मी आंध्रप्रदेशच्या विधानभवनात असताना त्याच्या सोबत अनुभवले आहे. त्यामुळे या आव्हानात्मक क्षेत्रात काम करताना पत्रकारांनी देश आणि लोकशाही मुल्यांची बांधिलकी जपत बातमीदारी करण्याचे आव्हान उत्कृष्ठपणे पेल ले असून मी त्यांचे अभिनंदन करतो.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून भिमा कोरेगावच्या मुद्यावर माध्यमांना आपण संयम बाळगण्याचे आवाहन केले होते आणि त्यानी सामाजिक बांधिलकी जपत ते पूर्ण केले. मात्र अश्या घटनाना चिथावणीखोर पध्दतीने किंवा यथार्थपध्दतीनेही त्यांना देता आले असते मात्र त्यांनी देखील सरकारच्या सोबत समाजाच्या सुरक्षेला प्राधान्य देत संयमाने बातम्या दिल्या याबाबत मुख्यमंत्र्यानी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की पत्रकारांच्या निवृत्ती वेतनाच्या मुद्यावर माझा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच निर्णय घेतला जाईल याची मी ग्वाही देतो. राज्यपाल विद्यासागर राव यांनी देखील सरकारने याबाबत निर्णय घेतल्यास त्याला आपण तातडीने अनुमती देवू असे जाहीर केले.

Previous articleभिडेंच्या हस्तकाकडून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका
Next articleमुद्रा योजनेत देशातील अव्वल तीन राज्यात महाराष्ट्राचा समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here