एकनाथ खडसे भाजपात जास्त काळ राहणार नाहीत

एकनाथ खडसे भाजपात जास्त काळ राहणार नाहीत

जळगाव : माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपात जास्त काळ राहणार नाहीत असे भाकित शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची वर्तवले आले ते आज जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपा आणि शिवसेनेची युती तोडण्यात एकनाथ खडसे यांचा पुढाकार होता. असे असले तरी त्यांच्याबाबत सहानुभूती असून, शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याबाबत ते इच्छुक असल्यास याबाबतचा निर्णय पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हेच घेतील असेही खा संजय राऊत यांनी सांगितले.
खडसे हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कानात जरा जास्तच बोलू लागले आहेत. अजित पवारही त्यांना टाळ्या देऊ लागले असल्याने खडसे हे भाजपात जास्त काळ राहणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleगोपीनाथ मुंडेसह ओबीसी समाजावर भाजपकडून अन्याय
Next articleअल्टामाऊंट रस्त्याला स्वातंत्र्य सैनिक मथुरादास मेहता यांचे नाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here