मुलुंड मध्ये बिबट्या ; खा. सोमय्या सेल्फीत मग्न !
मुंबई : मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात बिबट्या येण्याच्या वारंवार घटना घडत आहेत. मात्र आज मुलुंड परिसरात बिबट्या आढळून आला आणि एकच खळबळ उडाली.बिबट्याने एकूण सहा जणांवर हल्ला केला. ही बातमी वा-यासारखी पसरताच भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी धाव घेतली.मात्र त्यांनी आपल्या मतदारांची काळजी घेत, तिथे जमलेले पोलीस आणि बिबट्याने जखमी केलेल्या व्यक्तींसोबत सेल्फी काढण्यातच धन्यता मानली.
राष्ट्रीय उद्यानाच्या शेजारील मुलुंड, ठाणे आदी परिसरात बिबट्या घुसण्याच्या अनेक घटना घडत आहे शनिवारी सकाळ सकाळी मुलुंडमध्ये बिबट्या आल्याची बातमी वा-यासारखी पसरली. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळीच मुलुंड उपनगरात बिबट्या आढळून आल्याचे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट केले. या बिबट्याने येथिल एकूण सहा जणांवर हल्ला चढवला. या जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या ठिकाणी धाव घेतली. मात्र खासदारांनी या ठिकाणी जमलेले पोलीस आणि जखमी सोबत सेल्फी काढण्यात धन्यता मानली. मुलुंड पूर्वेकडील नानीपाडा भागात ही घटना घडली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी या बिबट्याला शोध घेत आहेत.