“अपघात वार” ; डहाणू जवळ बोट उलटून ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

“अपघात वार” ; डहाणू जवळ बोट उलटून ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुंबई : डहाणू जवळ समुद्रात बोट उलटून ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर; सांगली जिल्हयातील वांगी येथे क्रूझर गाडी व ट्रॅक्टरच्या समोरासमोर झालेल्या अपघातात ६ पैलवानांचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी असून, जुहू येथून अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या तळाकडे निघालेले हेलिकॉप्टर डहाणूजवळ समुद्रात कोसळले आहे.त्यामुळे आजचा शनिवार अपघात वार ठरला आहे.

डहाणू जवळ बोट उलटून दुर्घटना घडली आहे. या बोटमध्ये ४० विद्यार्थी होते. त्यापैकी आता पर्यंत ३२ विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले असून, आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे विद्यार्थी पोंडा विद्यालयातील आहेत.११ वी आणि १२ वीचे हे विद्यार्थी सहली करीता येथे आले सहलीसाठी हे विद्यार्थी समुद्रात गेले असताना बोट उलटून दुर्घटना घडली आहे. दुसरीकडे जुहू येथून अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या तळाकडे निघालेले हेलिकॉप्टर डहाणूजवळच कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह, ओएनजीसीचे ७ कर्मचारी होते. सकाळी एअर कन्ट्रोलशी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटल्याने ते समुद्रात कोसळल्याची भीती व्यक्त केली जात होती. नौदल आणि तटरक्षकदलाकडून समुद्रात बचावकार्य सुरु झाले आहे.ओेएनजीसीच्या ७ अधिकाऱ्यांना घेऊन निघालेल्या या हेलिकॉप्टरचे सकाळपासून एअर ट्राफिक कन्ट्रोलशी संपर्क होऊ शकला नव्हता. या हेलिकॉप्टरचे अवशेष नौदलाला या ठिकाणी आढळून आले आहेत.

सांगली जिल्हयातील वांगी येथे क्रूझर गाडी व ट्रॅक्टरचा समोरासमोर अपघात झाल्याने क्रूझरमधील सहा पैलवानांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर; सात जण जखमी झाले आहेत. सांगली -सातारा रोडवर वांगी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर रात्री हा अपघात झाला आहे.
क्रांती तालीम मंडळ, कुंडल येथील १३ पैलवान काल सातारा जिल्हयातील औंध येथे कुस्ती खेळण्यासाठी गेले होते. त्यानंतर परतीचा प्रवास करताना वांगी गावाच्या दिशेने येणा-या ऊस वाहतुक करणा-या ट्रॅक्टरने गाडीला धडक दिली.

Previous articleमुलुंड मध्ये बिबट्या ; खा. सोमय्या सेल्फीत मग्न !
Next articleनाणार रिफायनरीच्या वादात मनसेची उडी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here