राज ठाकरेनी घेतली अनिकेत कोथळे यांच्या कुटुंबियांची भेट

राज ठाकरेनी घेतली अनिकेत कोथळे यांच्या कुटुंबियांची भेट

सांगली : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सांगली दौ-यावर असून, त्यांनी आज पोलीस मारहाणीत मृत झालेले अनिकेत कोथळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.त्यांनी या भेटीत अनिकेत कोथळे यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही मार्गी लावला.

आज सांगली येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनिकेत कोथळे यांच्या कुटूबियांची भेट घेतली. याप्रकरणी मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलून  चर्चा करणार आहे असा दिलासा त्यांनी यावेळी कोथळे कुटुंबियांना दिला. पिडीत अनिकेत कोथळे यांच्या कुटुंबीयांनी उदरनिर्वाहासाठी अनिकेतच्या पत्नीला नोकरी मिळावी यासाठी राज ठाकरे यांच्याकडे मागणी केली, त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता राज ठाकरे यांनी भारती विद्यापीठाचे विश्वजीत कदम यांना फोन लावून अनिकेत कोथळे यांच्या पत्नीला सांगलीच्या भारती विद्यापीठात कायम स्वरूपी नोकरी देण्यासाठी शब्द टाकला असता, विश्वजित यानींही त्यांना नोकरी देण्याचे लगेच मान्य केले. अशा पध्दतीने पिडीत कोथळे कुटुबियांच्या उदरनिर्वाहाचा कायमस्वरुपी प्रश्न राज ठाकरे सोडविला.

Previous articleनाणार रिफायनरीच्या वादात मनसेची उडी !
Next articleनोकऱ्या मागणारे नव्हे, तर देणारे बना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here