अमिताभ बच्चन यांचे अनधिकृत बांधकाम पालिकेने केले नियमित

अमिताभ बच्चन यांचे अनधिकृत बांधकाम पालिकेने केले नियमित

मुंबई : महान अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या सहित अन्य सहा मोठ्या धेंड्यानी केलेले बांधकाम पालिकेने नियमित केल्याची माहिती, माहिती अधिकारात उडल झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनै पी. दक्षिण पालिका वॉर्ड कार्यालयाचे पद निर्देशित अधिकारी आणि सहायक अभियंता यांनी हि माहिति पत्राद्वारे दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस पाठविलेल्या पत्रात पी. दक्षिण पालिका वॉर्ड कार्यालयाचे पद निर्देशित अधिकारी आणि सहायक अभियंता यांनी स्पष्ट केले की, अमिताभ बच्चन आणि अन्य लोकांनी केलेले अनधिकृत बांधकामास एमआरटीपी ५३ (१) कायद्या अंतर्गत नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर मालक,रहिवाशी, विकासक यांच्यातर्फे वास्तुविशारद शशांक कोकीळ अँड असोसिएट्स यांनी दिनांक ५ जानेवारी २०१७ रोजी मंजूर आराखड्यात नसलेल्या बाबी मंजूर करण्याकामी सुधारित आराखडे मंजुरीकरिता कार्यकारी अभियंता, इमारत प्रस्ताव ( पश्चिम उपनगरे), पी विभाग यांच्याकडे सादर केले होते त्यानंतर कार्यकारी अभियंता, इमारत प्रस्ताव ( पश्चिम उपनगरे), पी विभाग यांच्याकडून अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आलेले आहे.

अमिताभ बच्चन, राजकुमार हिराणी, ओबेरॉय रियालिटी, पंकज बलानी, हरेश खंडेलवाल, संजय व्यास, हरेश जगतानी अशा ७ व्यक्तींना मंजूर आराखडयानुसार आढळून आलेल्या अनियमितता पूर्ववत करण्यासाठी एमआरटीपीची नोटीस ७ डिसेंबर २०१६ बजावली होती. एमआरटीपीची नोटीसनंतर वास्तुविशारद शशांक कोकीळ यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी सादर केलेला प्रस्ताव १७ मार्च २०१७ रोजी इमारत व प्रस्ताव खात्याने नामंजुर केला. याबाबत इमारत व प्रस्ताव खात्याने ११ एप्रिल २०१७ रोजी पी दक्षिण कार्यालयास रीतसर माहिती देताच ६ मे २०१७ रोजी पी दक्षिण कार्यालयाने अंतिम आदेश जारी करत अनधिकृत बांधकाम स्वतःहुन काढण्याची तंबी दिली. यानंतर वास्तुविशारद शशांक कोकीळ यांनी दुसऱ्यादा प्रस्ताव सादर केला होता.

गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांनि पत्र पाठवून ताबडतोब एमआरटीपी कायदा अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी करत अनधिकृत बांधकामे तोडण्याची मागणी केली होती पण या अनधिकृत बांधकामास नियमित करण्यासाठी वेळ खाऊ धोरण पालिकेने अवलंब करण्याचा आरोप गलगली यांनी केला आहे. इमारत प्रस्ताव खात्यातील काही अधिका-यांस अनधिकृत बांधकाम नियमित करण्याच्या प्रयत्नाला यश आले असल्याची टीका गलगली यांनी केली आहे.गरिबांच्या झोपडीवर बुलडोझर चालविणारी मुंबई महानगरपालिका बड्या धेंड्याच्या अनधिकृत बांधकामास नियमित करण्यात धन्यता मानते, अशी खंत गलगली यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleपंतप्रधान आवास योजने प्रमाणेच ‘एसआरए’ला घरे
Next articleमुंबईच्या सुरक्षिततेसाठी कठोर भूमिका घेतल्याबद्दल काँग्रेस पक्षाकडून नौदलाचे अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here