आई भवानीला साकडं घालून करणार हल्लाबोल यात्रेची सुरुवात

आई भवानीला साकडं घालून करणार हल्लाबोल यात्रेची सुरुवात

उस्मानाबाद :  भाजप-शिवसेना सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुळजापूरच्या आई भवानीचा आशिर्वाद घेत उदयापासून मराठवाडयामध्ये हल्लाबोल यात्रा सुरु होत आहे.

विदर्भामध्ये १५५ किलोमीटरची यवतमाळ ते नागपूर अशी सरकारविरोधी हल्लाबोल पदयात्रा काढल्यानंतर आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मराठवाडयावर लक्ष केंद्रीत करत इथल्या समस्या सोडविण्यामध्ये अपयशी ठरलेल्या सरकारच्याविरोधात हल्लाबोल यात्रेचे आयोजन केले आहे. त्याची पूर्वतयारी मराठवाडयातील नेते आणि पदाधिकारी मोठया जोमाने करताना दिसत आहेत.मंगळवारी १६ जानेवारीला सकाळी तुळजापूरच्या आई भवानीला साकडं घालून या हल्लाबोल यात्रेची सुरुवात होणार आहे. सकाळी या हल्लाबोल यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा सौ चित्राताई वाघ, आमदार राणा जगजितसिंग आदींसह मराठवाडयातील सर्व आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.आई भवानीचे दर्शन घेतल्यानंतर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असून त्यानंतर भव्य सभा होणार आहे. या सभेला न भूतो न भविष्यती अशी उपस्थिती दर्शवली जाणार असून त्याची जोरदार तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.दरम्यान या सभेनंतर सायंकाळी ४ वाजता उमरगा येथे जाहीर सभा होणार आहे.

मराठवाड्यात ८ जिल्ह्यात २७ तालुक्यात जवळपास १८०० किलोमीटरचा प्रवास होणार असून १० दिवसात २७ जाहीर सभा , मोर्चे, भेटी असा कार्यक्रम आहे.दिनांक १७ जानेवारीला सकाळी ११ वाजता भूम, दुपारी ४ वाजता पाटोदा,सायंकाळी ७ वाजता बीड, १८ जानेवारीला सकाळी ११ वाजता गेवराई, दुपारी ३ वाजता माजलगाव, सायंकाळी ७ वाजता अंबाजोगाई, १९ जानेवारीला सकाळी ११ वाजता औसा, दुपारी ४ वाजता उदगीर, सायंकाळी ७ वाजता अहमदपूर, २० जानेवारीला सकाळी ११ वाजता लोहा, दुपारी ३ वाजता गंगाखेड, सायंकाळी ७ वाजता परळी, २१ जानेवारीला दुपारी १ वाजता उमरी, सायंकाळी ५ वाजता माहुर, २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता हिंगोली, दुपारी ४ वाजता वसमत, सायंकाळी ७ वाजता परभणी, २३ जानेवारीला सकाळी ११ वाजता पाथरी, दुपारी ४ वाजता सेलू, सायंकाळी ७ वाजता मंठा, २४ जानेवारीला सकाळी ११ वाजता जाफराबाद, दुपारी ३ वाजता घनसावंगी, सायंकाळी ७ वाजता बदनापूर, आणि शेवटची जाहीर सभा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची ३ फेब्रुवारीला औरंगाबादला होणार आहे. या यात्रेमुळे मराठवाड्यातील पक्ष कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Previous articleचंद्रशेखर बावनकुळे भंडारा जिल्हयाचे पालकमंत्री
Next articleराज्यात गेल्या तीन वर्षात ५० लाख शौचालयांची उभारणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here