आई भवानीच्या साक्षीने राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात

आई भवानीच्या साक्षीने राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात

तुळजापूर : भाजप-शिवसेना सरकारच्याविरोधात आज आई भवानीचे दर्शन घेत आणि जनताविरोधी असलेल्या सरकारला खाली खेचण्याचे साकडे घालत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात झाली.

या आंदोलनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळाचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील,ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील,माजी मंत्री राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील,आमदार राणा जगजितसिंग, आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी,सर्व सेलचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन आणि त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळयाला अभिवादन करुन सर्वांनी आई भवानीचे दर्शन घेतले. याचवेळी आई भवानीच्या प्रांगणामध्ये फसव्या भाजप-शिवसेना सरकारच्याविरोधात गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेत्यांनी तुळजापूरच्या तहसिलदारांना सरकारविरोधी निवेदन सादर केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मराठवाडयातील हल्लाबोल आंदोलनाला आजपासून जोरदार सुरुवात झाली आहे. या आंदोलनामध्ये मराठवाडयातील जनता आणि पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.

Previous articleमाजी सभापती ना.स.फरांदे यांचे निधन
Next articleआगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here