शेतक-यांना वा-यावर सोडून सरकारने इनोव्हेह कंपनीला १०० कोटी दिले
धनंजय मुंडे यांचा आरोप
उस्मानाबाद ( भूम ) : सरकारने ऑनलाईन कर्जमाफी जाहीर केली मात्र ऑनलाइन घोटाळ्यामुळे एकाही शेतक-याला एक रुपयाही मिळाला नाही , हा घोटाळा करणा-या इंनोव्हेह कंपनीला मात्र १०० कोटी रुपये दिले असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
भूम परांडा येथे राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त आयोजित मोर्चा आणि सभेत ते बोलत होते.यावेळीविधीमंडळ गटनेते आ. अजित पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, पदमसिंग पाटील, आ.राजेश टोपे, आ.राणा दादा .आ. राहुल मोटे आ.विक्रम काळे, आ.सतिष चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, नवाब मलिक, रामराव वडकुते, विद्याताई चव्हाण, जीवनराव गोरे, संग्राम कोते, सुरेखा ठाकरे, जयदेव गायकवाड, ईश्वर बालबुद्धे, सोनालिताई देशमुख , डॉ नरेंद्र काळे आदी उपस्थित होते.शेतक-यांना वा-यावर सोडून ऑनलाईन चे बोगस काम करणा-या कंपनीला १०० कोटी आणि जाहिरातबाजीवर ३०० कोटी उधळल्याचा आरोप करून हे सरकार आणि या शिवसेना भाजपा हे दोन्ही पक्ष महाठग असल्याचा आरोप हि त्यांनी केला.