कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव

कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव

मुंबई :     कोल्हापूर येथील विमानतळाचे छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे नामकरण करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूर येथे विमानतळाची उभारणी केल्यानंतर १९३९ मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. सद्य:स्थितीत शासनाच्या प्रयत्नातून या विमानतळाचा विकास करण्यात येत असून प्रादेशिक जोडणी योजना (उडान) मधून लवकरच विमान सेवा सुरु करण्यात येणार आहे. कोल्हापूर विमानतळाच्या निर्मितीत छत्रपती राजाराम महाराज यांचे योगदान विचारात घेऊन राज्य शासनाने विमानतळाच्या नामकरणाची केंद्राकडे शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार नामकरण प्रस्तावास आगामी अधिवेशनात दोन्ही सभागृहाची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे.

Previous articleअनाथ मुलांना एक टक्के आरक्षण 
Next articleऔरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरून रामदास कदम यांना हटवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here