सरकारचा ‘विकास’ विजय मल्ल्यासारखा पळून गेला का 

सरकारचा ‘विकास’ विजय मल्ल्यासारखा पळून गेला का 

अजित पवारांचा सरकारला सवाल

लातूर ( उदगीर ) : विकासाच्या नावाने सत्तेत आलेल्या सरकारचा विकास हरवला असून तो विजय मल्ल्यासारखा पळून गेला का असा सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला उदगीरच्या जाहीर  सभेत केला.

लातूर जिल्हयातील दुसरी सभा उदगीरमध्ये मोठया उत्साहामध्ये पार पडली. सभेच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करुन सुरु करण्यात आला. या मोर्चात विधीमंडळ पक्षनेते अजित पवार सहभागी झाले होते. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आणि भव्य जाहीर सभा पार पडली.

व्यवहारी दृष्टीकोन न ठेवता सरकारने मुठभर लोकांसाठी नोटबंदी आणि कॅशलेससारखी योजना राबवली. या योजनेचा फायदा न होता माझ्या ग्रामीण भागातील लोकांना त्याचा फटका जास्त बसला.राज्यात नवीन गुंतवणूक नाही,नोकऱ्या नाहीत,फक्त साडेतीन वर्षात सरकार खड्डे बुजवत बसली आहे.सगळ्या योजना सरकारच्या अशापध्दतीच्या आहेत. नुसती बनवाबनवी,गाजर दाखवण्याचे,फेकूगिरी करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.मागच्यावेळी बटन दाबून केलेली चूक पुन्हा उदगीरकरांनो करु नका असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

Previous articleसर्वसामान्यांचे पाणी महाग झाले
Next article…आता रेशनिंगच्या दुकानातून मिळणार महानंदचे दूध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here