…आता रेशनिंगच्या दुकानातून मिळणार महानंदचे दूध

…आता रेशनिंगच्या दुकानातून मिळणार महानंदचे दूध

मुंबई : मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अधिकृत रास्त भाव दुकानातून महानंद दुग्ध शाळेचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आता विकत मिळणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित होणाऱ्या वस्तूंसह गव्हाच्या विशिष्ट जाती, तांदळाच्या विशिष्ट जाती, खाद्यतेल, पामतेल, कडधान्ये, डाळी गहू, शेंगदाणे, रवा, मैदा, चणाडाळ व भाजीपाला इत्यादी वस्तू त्याचप्रमाणे प्रमाणित बी-बियाणे विक्रीसाठी परवानगी देण्यात आली होती. याच धर्तीवर नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या मुंबई आणि ठाणे येथील शिधावाटप क्षेत्रातील अधिकृत रास्त भाव दुकानातून महानंद दुग्धशाळेचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवता येणार आहे.
महानंद दुग्धशाळा योजनेप्रमाणे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीपोटी मिळणाऱ्या कमिशनसाठी संबधित रास्तभाव दुकानदारांनी महानंद दुग्धशाळेच्या संबधित वितरकाशी परस्पर संपर्क साधणे अपेक्षित आहे. हा व्यवहार महानंद आणि रास्तभाव दुकानदार या दोघांत असणार आहे. यात शासनाचा कोणताही सहभाग व हस्तक्षेप राहणार नाही.

Previous articleसरकारचा ‘विकास’ विजय मल्ल्यासारखा पळून गेला का 
Next articleबांगलादेशी पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here