बांगलादेशी पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या
मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून ब-याच घटना घडल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटून भारतातील बांगलादेशी पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या. अशी मागणी व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
हज यात्रेकरूंना देण्यात येणारे अनुदान बंद करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. या मुद्दाला हात घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र रेखाटले आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर हे व्यंगचित्र प्रसिध्द केले असून, (अनु)दान आणि (राष्ट्र)धर्म’ असे शीर्षक देत सध्याची परिस्थिती दर्शवली आहे.भारतमाता आपल्या पंतप्रधानांशी संवाद साधत असल्याचे या व्यंगचित्रात दर्शविण्यात येवून,भारतमाता पंतप्रधान मोदींना सांगते आहे,की, अनुदान काढून घेतलेत ते बरोबरच आहे. देशात अजून अनेक अनुदाने दिली जात आहेत. ती सुध्दा काढून घ्या अशी मागणी त्यांनी करून भारतातील बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोर यांनाही हाकलून द्या असे भारतमाता पंतप्रधान मोदींना सांगते आहे. तर या घुसखोरांच्या मागे ‘भारतातील अतिरेकी घडवणारे मदरसे’ असे चित्रही रेखाटण्यात आले आहे.लवकरच व्यंगचित्रांची मालिका पुन्हा सुरू होईल असे सांगणा-या राज ठाकरे यांनी आपल्या अनेक दिवसाच्या विश्रांती नंतर पहिल्या व्यंगचित्रातून वास्तवाला हात घातला आहे.