उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा चौकशी अहवाल १५ दिवसात सरकारला सादर करणार

उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा चौकशी अहवाल १५ दिवसात सरकारला सादर करणार

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जमीन घोटाळा प्रकरणी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करणार्‍या के.पी बक्षी समिती आपला अहवाल येत्या १५ दिवसात सरकारला सादर करणार असून,या चौकशी समितीने विद्यमान उद्योगमंत्र्यासह,आघाडी सरकारच्या कार्यकाळातील उद्योग मंत्र्यांचीही चौकशी केल्याची माहिती समजते.

एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी के.पी.बक्षी यांची एकसदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात केली होती. हि चौकशी समिती गेल्या १५ वर्षांतील याबाबात घेण्यात आलेले निर्णय तपासणार असेही स्पष्ट केले होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर
गोंदेदुमाला, वाडिवरे येथील एमआयडीसी जमीन घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. विरोधी पक्षानी पावसाळी अधिवेशनात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीची ३० हजार एकर जमीन वगळल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार या चौकशी समितीने माजी उद्योगमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण आणि राजेंद्र दर्डा यांच्याकडून याबाबत माहिती मागवली होती. मिळालेल्या माहितीनुसार आघाडी सरकारच्या काळात अशा जमीनी मोठ्या प्रमाणात वगळली असल्याचे या चौकशीतून समोर आले आहे.के.पी बक्षी चौकशी समिती आपला अहवाल येत्या १५ दिवसात सरकारला सादर करणार असून,त्यानंतर मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेतील.

Previous articleबांगलादेशी पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या
Next articleपाण्याचे दर वाढवल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here