सरकारचा पायगुणच चांगला नाही राज्यात नुसत्या अळयाच अळया
अजित पवारांची सरकारवर टिका
नांदेड ( उमरी ) : या सरकारचा सत्तेत आल्यापासून पायगुणच चांगला नाही.शेतकऱ्यांच्या शेतात बोंडअळीने, तुडतुडया अळीने धुमाकुळ घातला आहे. हे सरकारच अळी असल्याची जोरदार टिका अजित पवार यांनी उमरीच्या जाहीर सभेत केली.
अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारवर हल्लाबोल करतानाच भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर आणि त्यांच्या कारभारावर जोरदार हल्ला केला. अजित पवार यांनी भाजप नेत्यांचे खुमासदार किस्से सांगतानाच भाजप प्रवेशकर्ते नारायण राणे यांनाही त्याच्या प्रवेशावर चिमटे काढले.भारनियमनमुळे लोक त्रासली होती १२ डिसेंबर १२ ला आम्ही शरद पवार साहेबांच्या वाढदिवशी राज्याला भारनियमनमुक्त केले. शेतकऱ्याला पार संपवायचं ठरवलं आहे का,भाव देत नाही सोयबीनला योग्यपध्तीचा दर देत नाही,साखरेचे भाव वाढवले,खताच्या किमती वाढवायच्या पाणीपट्टी वाढवायची मग आम्ही प्रपंच कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे असेही अजित पवार म्हणाले.गोदावरी नदी वर्षानुवर्ष वाहत जात होती. परंतु गोदावरीवर बॅरेजस केल्यानंतर आमच्यावर टिका झाली पण आज त्या नदीच्या बाजुचा परिसर हिरवागार झाला आहे. परंतु हेच बॅरेजस बंद करण्याचा घाट सरकार करत आहे असेही पवार म्हणाले.
कुणीही निवडून आले तरी आपल्याला काय फरत पडतो या पध्दतीमुळे जनतेचे नुकसान होत आहे. आपले प्रश्न समजण्याची आणि सोडवण्याची दृष्टी असणारे नेते जनतेने निवडून दिले पाहिजे. या देशाचे कृषीमंत्री कोण आहेत हे जनतेला माहित नाही. त्याचं नाव राधामोहन असले तरी त्यांच्यात राधाही नाही आणि मोहनही नाही अशी टिका पवार यांनी कृषीमंत्र्यांवर केली.हे सरकार गाजर दाखवण्यात फार हुशार आहे. सामान्य माणूस, शेतकरी, कामगार यांना तर भाजपने गाजर दाखवलेच पण मुख्यमंत्र्यांनी एका माजी मुख्यमंत्र्यांलाही मंत्रीपदाचे गाजर दाखवून ताटकळत ठेवले आहे.अशी टिकाही दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्र्यावर पवार यांनी केली.